हसन अलीला 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

March 25, 2011 9:23 AM0 commentsViews: 2

25 मार्च

कोट्यावधीचा कर बुडवणार्‍या हसन अलीला 8 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मुंबई सेशन कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यापूर्वी करचोरी प्रकरणी हसन अलीच्या वकिलांनी आज कोर्टासमोर काही कागदपत्र सादर केली आहेत.अंमलबजावणी संचालनालयाने हसन अलीच्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी कोर्टाकडे केली होती. हसन अलीला आज सेशन कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेत अलीला 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा हसन अलीने कोर्टात केला आहे. याबाबतचं पत्र सेशन कोर्टात सादर केलं. काशिनाथ टापूरिया, गोयंका यांच्याकडून धोका असल्याचा संशय अलीने व्यक्त केला आहे.

close