जपानमध्ये भूकंपबळीची संख्या 10 हजारांवर

March 25, 2011 9:29 AM0 commentsViews: 5

25 मार्च

जपानमधील भूकंपातील मृतांची अधिकृत संख्या 10 हजारांवर पोहचली आहे. तर 27 हजारांपेक्षा जास्त लोक या भूकंपात ठार किंवा बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर 17 हजार 352 जण अजूनही बेपत्ता आहेत. हजारो नागरिक सरकारने उभारलेल्या शेल्टरमध्ये राहतायत. तर मियागी प्रांतात 2 हजारांपेक्षा जास्त मृतदेहांची ओळख पटलेली नाही. मियागी आणि इवाटे प्रांतात मृतांच्या वाढत्या संख्येमुळे स्मशानभूमीतील यंत्रणा तोकड्या पडल्या आहेत. जपानी परंपरेनुसार मृतदेहाचं दफन केलं जात नाही. पण या परिस्थितीमुळे जवळपास 100 मृतदेहांचं दफन करण्यात आलंय. दुसरीकडे फुकुशिमा दायाची प्रकल्पातील पहिल्या अणुभट्टीतील विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु झाला आहे. तर तिसर्‍या प्रकल्पातील कामगारांना रेडिएशनची मोठ्या प्रमाणात बाधा झाली. उत्पादीत भाजीपाल्यांमध्येही किरणोत्सर्गाचे प्रमाण आढळून आलं आहे. त्यामुळे युरोपीयन युनियनने जपानच्या काही प्रांतातील अन्न पदाथांर्च्या आयातीवर तात्पुरती बंदी घालण्याचा इशारा दिला. तसेच जपानमधील बुलेट ट्रेन सेवा अजूनही पूर्णपणे सुरु झालेली नाही.

close