राज ठाकरेंची कल्याण पोलीस ठाण्यात चौकशी

November 8, 2008 9:17 AM0 commentsViews: 5

8 नोव्हेंबर, मुंबईमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. रेल्वे भरती वोर्डाची परीक्षा उधळल्या प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यात कल्याण कोर्टाने राज ठाकरे यांना अटकपूर्व जामीन दिला होता. पण कल्याण कोर्टाने पोलिस चौकशीसाठी बोलवतील तेव्हा पोलिस ठाण्यात हजर रहावे अशी अटही टाकण्यात आली होती. त्यानुसार आज राज ठाकरे हजर झाले. पिसवली गावातील आंदोलनात दोन उत्तरभारतीयांची हत्या झाली होती. त्याबाबत ही चौकशी करण्यात आली.

close