अजित पवारांवर विरोधकांचा रोष

March 26, 2011 10:36 AM0 commentsViews: 1

26 मार्च

आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर काल विरोधकांनी विधिमंडळाच्या पायर्‍यांवरचं धरण आंदोलन केलं. यावेळी विरोधकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं ते उपमुख्यमंत्री अजित पवारांना. विधिमंडळातून अजित पवार बाहेर पडत असतांना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हे सरकार कुणाचे टग्याचे टग्याचे म्हणत विरोधकांनी अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्या घोषणाबाजीकडे दुर्लक्ष करत अजित पवार निघून गेले.

close