महामुकाबल्यासाठी दोन्ही संघ मोहालीत दाखल

March 26, 2011 10:45 AM0 commentsViews: 1

26 मार्च

भारतीय क्रिकेट टीमही आज सेमी फायनल मॅचसाठी चंदिगढला पोहोचली आहे. येत्या बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर त्यांची सेमी फायनल मॅच आहे. हा महा मुकाबला रंगणार आहे मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर. दुपारी अडीच वाजता ही मॅच सुरु होईल. भारतीय टीमने सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय तो गतविजेत्या ऑस्ट्रेलियन टीमचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव करत त्यामुळे येत्या मॅचवर सर्व भारतीयांचं लक्ष लागलं आहे.दरम्यान मोहालीत होणार्‍या या मॅचसाठी पाकिस्तानची टीमही चंदिगढमध्ये दाखल झाली आहे. या मॅचला आणखी पाच दिवसांचा अवधी असल्याने पाकिस्तानच्या टीमला सरावासाठी चांगला वेळ मिळाला आहे. दरम्यान, सेमीफायनल मॅचमध्ये भारतीय टीम फेव्हरिट असली तरी भारतीय टीमवरचं अधिक दडपण असेल, असं मत पाकिस्तानचा माजी कॅप्टन इम्रान खान यानं व्यक्त केलंय. तर भारताविरुध्द दोन हात करायला टीम तयार असल्याचे कॅप्टन शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे.

close