बुलढाण्यात अॅसिड वाहून नेणारा टँकर उलटला

March 26, 2011 12:13 PM0 commentsViews: 6

26 मार्च

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळ अॅसिड वाहून नेणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे या टँकरमधील अॅसिड 2 किलोमीटर पर्यंत वाहून गेलंय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा अपघात घडला आहे. टँकरमधील अॅसिड रस्स्तावर पडताच त्याची पावडर तयार झाली. आणि ही पावडर इतर वाहनांच्या टायरला लागून परिसरात पसरतेय. यामुळे स्थानिक रहिवाशांना आरोग्याच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. डोळ्यांची जळजळ, खाज सुटणे, मळमळ होणे असे त्रास नागरिकांना होत आहेत. याबाबत आरोग्य यंत्रणेने मात्र अद्यापही कोणती उपाययोजना केलेली नाही. यामुळे अनेक अफवा पसरुन नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण आहे.

close