पुण्यात बसस्टॉप जळून खाक

March 26, 2011 12:24 PM0 commentsViews: 5

26 मार्च

पुण्यातील कोंढवा- बिबवेवाडी रोडवर आज सकाळी 11.30 च्या सुमारास बसस्टॉपनं पेट घेतला. बसस्टॉप पीव्हीसी मटेरीयलचा असल्याने पाहता पाहता अख्खा बसस्टॉप आगीत जळून खाक झाला. आयबीएन लोकमतचे जागरूक प्रेक्षक सिटिजन जर्नलिस्ट मुकुंद काकडे त्यावेळी त्याच रस्त्यावरून एका कार्यक्रमाला चालले होते. त्यांनी कॅमेर्‍यात दृश्य टिपली. कोंढवा बिबवेवाडी रस्त्यावर गंगादाम स्टॉपजवळील पोस्ट ऍंड टेलीग्राफ कॉलनीजवळचा हा बसस्टॉप आहे. अक्षरश:अवघ्या काही मिनटात बसस्टॉप जळून खाक झाला. बसस्टॉपच्यावर झाडाचा पाचोळाही साठला होता. त्यामुळे आग लवकर पसरली.

close