मुंबईतील प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्री आणि जयराम रमेश यांच्यात चर्चा

March 26, 2011 2:26 PM0 commentsViews: 3

26 मार्च

जैतापूरच्या प्रश्नावर नव्यानं वाद निर्माण होत असतानाचं आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी भेट घेतली. राजधानी दिल्लीत ही भेट झाली. जपानमधील फुकुशिमा प्रकल्पाला त्सुनामीचा फटका बसल्यानंतर जैतापूरच्या संकल्पित प्रकल्पाच्या सुरक्षेचा आम्ही पुर्नविचार करु अशी घोषणा जयराम रमेश यांनी गेल्या आठवड्यात केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण मंत्र्यांची आज भेट घेतली. या बैठकीत मुंबईमधल्या पायाभूत सुविधांवरही चर्चा झाली. मुंबईतील अनेक मोठे प्रकल्प पर्यावरण मंत्रालयाची परवानगी न मिळाल्यानं रखडले आहेत. या बद्दल मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. याच विषयावर पाहणी आणि चर्चा करण्यासाठी जयराम रमेश 11 एप्रिलला मुंबईत येणार आहेत.

close