ऑस्ट्रेलिया 355 रन्सवर ऑल आउट

November 8, 2008 9:41 AM0 commentsViews: 3

08 नोव्हेंबर नागपूर,नागपूर टेस्टमध्ये हरभजन, अमित मिश्राच्या स्पिन बॉलिंगपुढे ऑस्ट्रेलियाचा धावांचा वेग मंदावलाय.पहिल्या सत्रात कॅटिच आणि हसी हे जम बसलेले बॅट्समन फक्त 41 रन्स करू शकले. त्यामुळे भारतीय बॉलर्स आणि ऑस्ट्रेलियन बॅट्समन यांच्यात चांगली जुगलबंदी बघायला मिळाली. सकाळी ऑस्ट्रेलियाचा ओपनर सायमन कॅटिचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली आपली पाचवी सेंच्युरी पूर्ण केली. माईक हसी बरोबर तिस-या विकेटसाठी त्याने 155 रन्सची पार्टनरशिप केली. अखेर झहीर खानने ही जोडी फोडली. त्याने कॅटिचला 102 रन्सवर एल बी डब्ल्यू केलं. जम बसलेल्या हसीची सेंच्युरी हुकली. हसी 90 रन्सवर आऊट झाला. तर क्लार्क 8 आणि वॅटसन 2 रन्सवर तंबूत परतले.ब्रॅड हेडीन आणि कॅमेरून व्हाइट खेळत आहेत. दुपारच्या सत्रापर्यत ऑस्ट्रेलियाचे 6 विकेटवर311 रन्स झाले होते.त्यानंतर हरभजन आणि इशांत शर्माने एक-एक विकेट घेतली. अमित मिश्राने दोन विकेट काढत ऑस्ट्रेलियाचं शेपूट गुंडाळलं. तिस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया 355 रन्सवर ऑल आउट होऊन भारताला दुस-या इनिंगमध्ये 86 रन्सची आघाडी मिळाली आहे.

close