कोल्हापूरमध्ये भरले अपंगांचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन

March 26, 2011 2:41 PM0 commentsViews: 4

26 मार्च

अपंगांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथं अपंगांचे पहिले राज्यस्तरीय साहित्य -संस्कृती संमेलन भरवण्यात आलं आहे. या संमेलनाचे उद्घाटन चित्रपट दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्याहस्ते आणि साहित्यिक – कवी अशोक थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. या संमेलनामध्ये कला, साहित्य, सामाजिक, क्रीडा, संगीत आणि शिक्षण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने समाजाला प्रभावीत करणार्‍या अपंग व्यक्तीचा चित्रपट दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्याहस्ते शाल श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.