श्रीलंकेचा ‘दिल’शानदार विजय

March 26, 2011 4:38 PM0 commentsViews: 1

26 मार्च

वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये चौथी टीमही निश्चित झाली आहेत. आज शनिवारी झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये श्रीलंकेने इंग्लंडचा 10 विकेट राखून धुव्वा उडवला. आणि सेमीफायनलमध्ये शानदार प्रवेश केला आहे. आता लंकेची सेमीफायनलमध्ये गाठ पडेल ती न्यूझीलंडशी. मात्र इंग्लंडला लाजीरवाण्या पराभवाला सामोर जावं लागलं आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या इंग्लंडने विजयासाठी श्रीलंकेसमोर 230 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण तिलकरत्ने दिलशान आणि उपुल थरंगा या ओपनिंग जोडीनं 40 व्या ओव्हरमध्येच हे आव्हान पार केलं. दिलशान आणि थरंगा या दोघांनी नॉटआऊट सेंच्युरी ठोकली. कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियवर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार्‍या श्रीलंकेने विजेत्याच्या थाटातच खेळ केला. इंग्लंडने तब्बल सहा बॉलर्स वापरले पण एकाही बॉलरला विकेट घेण्यात यश आलं नाही.

close