भारत-पाक सेमीफायनलचं तिकीट ‘एक लाख रूपयांना’ !

March 27, 2011 2:46 PM0 commentsViews: 1

27 मार्च

मोहालीत होणार्‍या भारत-पाक म् मेगा सेमीफायनलसाठी क्रिकेट फॅन्सची प्रचंड गर्दी झालीय. त्यामुळेच इथे तिकीटाचं ब्लॅक मार्केट जोरात सुरू आहे. वाट्टेल ती किंमत देऊन प्रेक्षक तिकीट विकत घेत आहे. 15 हजाराचे तिकीट एक लाख रूपयांना विकले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर दहा हजाराचे तिकीट पन्नास हजारांना विकले जात आहे. मोहालीच्या स्टेडियममध्ये एकूण 28 हजार सीट्स त्यापैकी 12 हजार तिकीट पंजाब क्रिकेट असोसिएशनची आहेत. तर उरलेली 16 हजार तिकीट अक्षरश:तासाभरात विकली गेली आहे.

close