आमदार निलंबन प्रकरणी बैठकीची पहिली फेरी निष्फळ

March 28, 2011 8:53 AM0 commentsViews: 2

28 मार्च

अर्थसंकल्पात गोंधळ घालणार्‍या युतीच्या नऊ आमदारांच्या निलंबनावर चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीमध्ये पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून बजेटमधील विकासनिधी वाढवून घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच इतर योजनाच्या निधीवाटपामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांनाही सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत यामागण्यावर सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. तोपर्यंत विधिमंडळ कामकाजावर बहिष्कार कायम राहिल अशी माहिती विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिली. विरोधकांच्या प्रस्तावावर पुन्हा एकदा दुपारी 3 वाजता सरकार आणि विरोधकांमध्ये बैठकीची दुसरी फेरी सुरू होणार आहे. दरम्यान, दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधकांशिवायच सरकार रेटून नेत आहे.

close