भारतात वाघांच्या संख्येत वाढ

March 28, 2011 9:02 AM0 commentsViews: 3

28 मार्च

देशभरातील वाघांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागिल 2008च्या व्याघ्र गणनेत वाघांची संख्या 1,411 वरुन आता तीच संख्या 1706 इतकी झाली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. मध्य भारतात 601 वाघांची नोंद झाली आहे. गेल्या वेळी मध्य भारतात 601 वाघांचीच नोंद झाली होती.

शिवालिक भागात वाघांची संख्या 297 वरुन 353 वर गेली आहे. तर उत्तर-पूर्व भागातही वाघांची संख्या वाढलेली दिसली. त्याठिकाणी वाघांची संख्या 100 वरन 148 झाली. सुंदरबनमध्येही यावेळी 70 वाघांची नोंद झाली आहे. गेल्या वेळच्या व्याघ्र गणनेत सुंदरबनचा समावेश करण्यात आला नव्हता. यावेळी वाघांची गणती अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात आली. ही गणती वाघांच्या जंगलांमध्ये कॅमेरा ट्रॅपिंग पद्धतीने करण्यात आली आहे.

close