हसन अली प्रकरणी कोर्टाने एन्फोर्समेंट डिरोक्टरोटला फटकारले

March 28, 2011 9:13 AM0 commentsViews: 1

28 मार्च

साल 2008 पासून एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट झोपलं आहे का ? काळ्या पैशासंदर्भात योग्य तो तपास का केला नाही ? अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले आहे. काळ्यापैश्या बाबतचा स्त्रोत शोधून काढा असे आदेशही सुप्रीम कोर्टानं ईडीला दिले आहे. काळ्या पैशांसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. यामध्ये हसन अलीच्या जीवाला धोका असल्याची माहिती ईडीने कोर्टाला दिली आहे.

त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास करणार्‍या ईडीच्या अधिकार्‍यांनाही संरक्षण हवं आहे अशी मागणीही ईडीने कोर्टाकडे केली आहे. त्याचबरोबर काळ्या पैश्यासंदर्भातल्या तपासात आम्हाला यश आलंय असं ईडीने म्हटले आहे. दरम्यान, हसन अली केसची स्टेटस रिपोर्ट मिळ्यावरही केंद्र सरकारने राष्ट्रीय हित लक्षात घेता कारवाई का केली नाही असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे.

close