सचिनच्या विकेटसाठी रणनीती !

March 28, 2011 9:28 AM0 commentsViews: 2

28 मार्च

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार्‍या सेमी फायनलचा फिव्हर वाढतच चालला आहे. दोन्ही टीम्स या मॅचसाठी कसून सराव करत आहेत. पण पाकिस्तान क्रिकेट टीमची रणनीती उघड झाली आहे. पाकिस्तान टीमचा यावेळी फोकस असणार आहे तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर.

सचिनला लवकरात लवकर आउट करून भारतीय टीमवर दबाब टाकण्याची रणनीती पाकिस्तान टीमची असणार आहे. आणि पाकिस्तानचा फास्ट बॉलर उमर गुलवर सचिनला आऊट करायची जवाबदारी सोपवल्याचं समजत आहे. सचिनवरच लक्ष केंदि्रत करायचा सल्ला उमर गुलला देण्यात आला आहे. पाकिस्तानच्या या रणनीतीचा खुलासा पाकिस्तानच्या जंग या वृत्तपत्राचे संपादक माजिद भट्ट यांनी केला आहे.

close