मेगा सेमीफायनलसाठी पाकिस्तानचे फॅन्सही भारतात दाखल

March 28, 2011 10:38 AM0 commentsViews: 4

28 मार्च

क्रिकेटमुळे भारत-पाकिस्तानमधील दरी कमी होतेय. सगळीकडे एकच चर्चा आहे. ती म्हणजे या सामन्याबद्दलची त्यातच आता मोहालीतल्या सेमीफायनलसाठी पाकिस्तानी फॅन्स भारतात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. आज सोमवारी सकाळीचअट्टारी रेल्वे स्टेशनवर पाकिस्तानी फॅन्स उतरले आहेत.

तसेच लाहोरहून येणार्‍या सद्भावना एक्सप्रेसमधूनही पाकिस्तानी फॅन्स येत आहे. मात्र तिकीटांसाठीची मारामारी मात्र सुरूच आहे. मॅचची सगळी तिकीट विकली गेली आहे आणि आता तिकीटासाठीचे ब्लॅक मार्केट जोरात सुरू आहे. आज सकाळीच पोलिसांनी तिकीटाचा काळा बाजार करणार्‍या 8 जणांना अटक केली आहे. ऑनलाईन तिकीटविक्री करणार्‍या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला चंदिगढ पोलिसांच्या सायबर क्राईम ब्रँचने अटक केली आहे. 250 रुपयांची पाच तिकीट तो तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करत होता. आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

close