दूध भेसळखोरांना फाशीच्या शिक्षेचा प्रस्ताव

March 28, 2011 5:50 PM0 commentsViews: 1

26 मार्च

दुधात भेसळ करणार्‍यांना फाशीची शिक्षा देता येईल असं कलम लावण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. राज्यात दूध भेसळीचे प्रकार उघडझाल्यानंतर राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठीच अशी भेसळ करणार्‍यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद असावी असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानसभेत दिली.

close