सणांच्या दिवसातही रिटेल कंपनींची विक्री निराशादायक

November 8, 2008 9:41 AM0 commentsViews: 12

08 नोव्हेंबरगेले दोन महिने सणांचे दिवस होते.सर्वत्र खरेदी होत होती. पण इतकं असूनही रिलायन्स रिटेल सारख्या कंपनीची दिवाळीतली विक्री निराशादायक होती. पैशांची कमतरता कशी पूर्ण करायची हा प्रश्न सध्या रिलायन्स रिटेलपुढं उभा आहे. रिलायन्स रिटेलची यंदाची दिवाळी फारशी उत्साहात गेली नाही. वाढते व्याजदर आणि महागाई या गोष्टींनी त्यांच्या ग्राहकांना यावेळी खरेदीपासून दूरच ठेवलं. दागिने,इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे आणि चपलांसारख्या वस्तूंची विक्री समाधानकारक होती. पण बाकी सेक्शन्समधल्या वस्तूंना फार कमी प्रतिसाद मिळाला. पण आता पैशांच्या या समस्येवरही कंपनीनं उपाय शोधण्याचा प्रयत्न केलाय. रिलायन्स रिटेलची देशातल्या 57 शहरात 800 स्टोअर्स आहेत. गेल्या तीन महिन्यात कंपनीनं आणखी 80 स्टोअर्स उघडली आहेत. खर्च तर वाढतोय म्हणूनच पैसे वाचवण्यासाठी कंपनी कमी दरात करारावर दुकानं घेणार आहे. काही शहरातील कमी महसूल देणारी आऊटलेटस बंद करणार आहेत. तसंच दुकानांची रचना बदलून खर्च कमी करण्याचा प्रयत्नही करणार आहे. यावरून असं दिसतंय मार्केटमध्ये खप होत नसला तरी रिलायन्स रिटेलनं विस्ताराच्या योजना मागे ठेवलेल्या नाहीत. कारण देशात संघटीत रिटेल व्यवसाय पसरायला अजून खूप वाव आहे. त्यामुळे जोपर्यंत ग्राहक खरेदी करत राहतील तोपर्यंत तरी रिलायन्स रिटेलला आघाडी मिळवायला संधी आहे.

close