सुशिलकुमार शिंदेची आदर्शच्या फाईलवर सही केल्याची कबूली

March 28, 2011 11:43 AM0 commentsViews:

28 मार्च

आदर्श गृहनिर्माण प्रकल्पासंदर्भातील फाईलवर आपणच सही केल्याची जाहीर कबूली केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे. काल रविवारी सोलापुरात एका स्थानिक वृत्तवाहिनीचे उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. त्यावेळी आदर्शप्रकरणी बोलतांना 71 सदस्यांच्या फाईलवर आपणच सही केल्याची कबूली त्यांनी दिली. पण फाईल कोण पाहतं. वेळ कुठे असतो अशी त्याबद्दलची सफाईही सुशिलकुमार शिंदे यांनी केली आहे.

close