मोनिका हत्या प्रकरणी संशयितांचे स्केचेस जारी

March 28, 2011 12:16 PM0 commentsViews: 1

28 मार्च

नागपूरमधील मोनिका किरणापुरे हत्याप्रकरणाला आज 18 दिवस झाले आहेत. आणि आज पहिल्यांदा या प्रकरणी साक्ष देण्यासाठी दोन साक्षीदार पुढे आले आहेत. त्यांनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांनी दोन संशयितांची स्केच जारी केली आहे. सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे या साक्षीदारांची नावं मात्र गुप्त ठेवण्यात आली आहेत.

11 मार्च ला नागपूरमधील नंदनवन भागात मोनिकाची भर दिवसा हत्या झाली होती. पण हल्लेखोरांबद्दल माहिती मिळाली नसल्याने तपास अजिबात पुढे गेला नव्हता. सरकारने आवाहन करूनही एकही साक्षीदार माहिती देण्यासाठी पुढे येत नव्हता. पण आता ही रेखाचित्र मिळाल्याने पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा दुवा सापडला आहे. या रेखाचित्रांवरून हल्लेखोरांची माहिती देण्यासाठी लोकांनी पुढे यावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मोनिकाच्या मारेकर्‍यांची माहिती देणार्‍याला 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा सरकारने याआधीच केली आहे.

close