टीम इंडियाच्या विजयासाठी मशीदमध्ये चादर चढवण्यात आली

March 28, 2011 12:44 PM0 commentsViews: 3

28 मार्च

वर्ल्ड कप 2011 च्या पाकिस्तानविरोधातील सेमीफायनल मॅच भारतानेच जिंकावी यासाठी क्रिकेटप्रेमी ठिकठिकाणी देवालाही साकडे घालत आहे. औरंगाबादमध्ये सामुदायिक प्रार्थना आणि पूजा अर्चा केली जातेय. एकीकडे मंदिरात पूजाअर्चा, आरत्या आणि देवाला अभिषेक केला जातोय. तर दुसरीकडे मशीद आणि दर्ग्यात दुआ मागितली जात आहे. शहरातील शहानूर मियाँ दर्ग्यात भारताच्या विजयासाठी चादर चढविण्यात आली आहे. तर जयविश्वभारती कॉलनीतील महादेवच्या मंदिरात अभिषेक करण्यात आला.

close