विधिमंडळापुढचा पेच अजूनही कायम ; बैठक लांबणीवर

March 28, 2011 1:37 PM0 commentsViews:

28 मार्च

आमदार निलंबन प्रकरणी विरोधकांच्या प्रस्तावावर पुन्हा एकदा सरकार आणि विरोधकांमध्ये बैठकीची दुसरी फेरी होणार होती. पण ती पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान विधानसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. त्यामुळे आज सोमवारी होणार असलेली बजेटवरची चर्चा आता लांबणीवर टाकण्यात आली आहे.

युतीच्या नऊ आमदारांच्या निलंबनावर चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीमध्ये पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून बजेटमधला विकासनिधी वाढवून देण्याची मागणी विरोधकांनी केली. तसेच इतर योजनांच्या निधीवाटपामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांनाही सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत यामागण्यांवर सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. तोपर्यंत विधिमंडळ कामकाजावर बहिष्कार कायम राहिल अशी माहिती विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिली.

close