लोकपाल विधेयक प्रश्नी अण्णा हजारेंचा बेमुदत उपोषणाचा इशारा

March 28, 2011 1:51 PM0 commentsViews: 2

28 मार्च

भ्रष्टाचाराविरोधी कडक कारवाई करण्यासाठी लोकपाल विधेयक लवकर मांडण्यात यावं, तसेच मंजूर करण्यात यावं यासाठी पाच एप्रिलपासून नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. तसेच 12 एप्रिलपासून देशभरात जेलभरो आंदोलनही पुकारलं जाईल असा इशारा अण्णांनी दिला आहे.

आज मुंबईमध्ये अण्णा हजारे आणि माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी लोकपाल विधेयकासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. गेले अनेक दिवस अण्णा लोकपाल विधेयकासाठी जनाधार मिळवण्याकरिता राज्यव्यापी दौरा करत आहे. लोकपाल विधेयकामध्ये आरटीआय कार्यकर्त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा अंतर्भूत करण्यात यावा. अशी अण्णांची मागणी आहे. आरटीआय ऍक्टिव्हिस्टना संरक्षणाची गरज वाटल्यास ते लोकपालांकडे दाद मागण्यासाठी जाऊ शकतील अशी तरतूद करावी अशी त्यांची मागणी आहे.

सध्या सरकारने तयार केलेलं लोकपाल विधेयक हे खासदारांपुरतं मर्यादित आहे. त्याला पर्यायी असणारे 'जनलोकपाल विधेयक' तयार करण्यात आलंय. सरकारने हा नवा मसुदा विचारात घ्यावा किंवा सरकारचे लोकपाल विधेयक आणि लोकपाल विधेयक या दोन्हींच्या अभ्यासासाठी एक समिती नेमावी अशीही अण्णांची मागणी आहे.

close