भारत-पाक मॅचसाठी त्याने ऑपरेशन पुढे ढकललं

March 28, 2011 3:39 PM0 commentsViews: 1

28 मार्च

वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाक सेमीफायनचा फिव्हर सगळीकडेच दिसून येत आहे. असाचा फिव्हर चढलेल्या ठाण्यातल्या एका रुग्णाने ही मॅच पाहण्यासाठी चक्क आपलं ऑपरेशनच पुढे ढकललं आहे. या रूग्णाला पाहणारे डॉक्टर ही या प्रकाराने चक्रावले आहेत. 35 वर्षीय अभिषेक चतुर्वेदी यांना मागील दीड महिन्यांपासून पाठीच्या मणक्याचा त्रास जाणवतोय. यामुळे त्यांना चालताही येत नाही. तरीही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर आपल्याला मॅच पाहता येणार नाही म्हणून त्यांनी आपलं ऑपरेशनच पुढे ढकललं आहे.

close