गिरणी कामगारांचे सीएसटी स्टेशनसमोर रास्ता रोको आंदोलन

March 28, 2011 3:58 PM0 commentsViews: 5

28 मार्च

आपल्या हक्कांची घरं देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत गिरणी कामगारांनी सरकारचा निषेध म्हणून सीएसटी स्टेशनसमोर रास्ता रोको आंदोलन केलं. गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर आणि दादा सामंत यांच्या नेतृत्वाखाली शेकडोंच्या संख्येने भारतमाता थिएटर ते विधान भवनपर्यंत गिरणी कामगारांचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा आझाद मैदान पोलिसांनी सीएसटी स्टेशनसमोर अडवला.

त्यामुळे गिरणी कामगारांनी रास्ता रोको केला. यावेळी आझाद मैदान पोलिसांनी 500 गिरणी कामगांराना ताब्यात घेतलं. जोपर्यंत गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमती सरकार कमी करणार नाही तोपर्यंत गिरणी कामगार विविध मार्गांनी आंदोलन करतील असा प्रस्ताव यावेळी गिरणी कामगारांनी दिला.

close