पुणे गॅस प्रकल्पाबाबत हिरानदांनी पत्नीसह कोर्टात हजर

March 28, 2011 4:08 PM0 commentsViews: 1

28 मार्च

पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ कार्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करत निरंजन हिरानदांनी आज त्यांच्या पत्नीसह कोर्टात हजर झाले. नवलाख उमरे इथं हिरानंदानी गॅस विद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प उभारतांना त्यांनी पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वडगाव मावळ कोर्टाने हिरानंदानींसह त्यांची पत्नी आणि मुलांसह इतर चौघांना वेळोवेळी समन्स बजावले होते.

परंतु हिरानंदानी आणि त्यांचे कुटुंबीय न्यायालयात हजर राहत नसल्याने कोर्टाने नोटीस बजावली होती. नवलाख उमरे येथील प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हा प्रकल्प उभारतांना आपण सर्व संबधीत विभागाच्या परवानग्या मिळवल्याचा दावाही त्यांनी केला. परंतु या प्रकल्पाला नेमका कुणाचा विरोध आहे आणि प्रकल्प इतर राज्यात नेण्यासाठी तुमच्यावर कोण दबाव टाकतोय या प्रश्नाच उत्तर ते देऊ शकले नाहीत.

close