मॅच-फिक्सिंगमध्ये सहभागी होऊ नका !

March 28, 2011 4:51 PM0 commentsViews: 2

28 मार्च

एकीकडे भारत-पाक मॅचसाठी तयारी जोरदार सुरू आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी क्रिकेट टीमवरून नवा वाद उफाळला आहे. पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांनी पाकिस्तानी खेळाडूंना इशारा दिला आहे. मॅच-फिक्सिंगमध्ये सहभागी होऊ नका असं त्यांनी बजावलंय. सरकार आणि गुप्तचर संस्था क्रिकेटपटू आणि त्यांच्या फोन कॉल्सवर नजर ठेवून आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. रेहमान मलिक यांचं हे म्हणणं अपमानकारक आहे असं त्यानं म्हटलंय. आधीच खेळाडूंवर प्रचंड दडपण आहे त्यात रहमान मलिक यांचं हे वक्तव्य त्यांचं लक्ष विचलित करू शकतं असंही त्यानं म्हटलंय.

close