स्पेक्ट्रम प्रकरणी नीरा राडिया आणि अनिल अंबनींची चौकशी होणार

March 28, 2011 5:16 PM0 commentsViews: 2

28 मार्च

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा तपास आता थेट उद्योगपती रतन टाटा आणि अनिल अंबानींपर्यंत पोहचला आहे. संसदेच्या लोकलेखा समितीने या दोघा बड्या उद्योगपतींना 4 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहायला सांगितले आहे. त्यांच्यासोबतच पीआर व्यावसायिक नीरा राडिया, स्वॉन टेलिकॉमचे विनोद गोएंका आणि युनिटेकचे शिवा शंकरन यांनाही हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आला आहे. दरम्यान, 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित सगळ्या केसेसचा निवाडा करण्यासाठी एक स्पेशल कोर्ट स्थापन करण्यात आलंय. न्यायमूर्ती ओ पी सैनी यांची त्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

close