रत्नागिरीत प्रदुषणाला कंटाळून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

March 29, 2011 10:13 AM0 commentsViews: 34

29 मार्च

रत्नागिरीच्या खेडमधील लोटे एमआयडीसीच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पात एक व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. राजेंद्र आंब्रे असं या व्यक्तीचं नाव आहे. एमआयडीसीतल्या सांडपाण्याच्या प्रदुषणाला कंटाळून आंब्रे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. केमिकल युक्त सांडपाणी त्यांच्या पोटात गेल्यामुळे आंब्रे यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. आंब्रे यांच्यावर खेडजवळच्या परशुराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

लोटे एमआयडीसीतल्या सांडपाण्यावर प्रक्रीया करणारा सीईटीपी प्रकल्प गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहे. याबाबत नागरिकांनी अनेक आंदोलनही केली. तर आंब्रे यांनी ही अनेक वेळा एमपीसीबी म्हणजेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला कळवूनही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे कंटाळून त्यांनी या प्रकल्पाच्या सांडपाणी साठवणुकीच्या टाकीतच उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे डॉ. माधव गाडगीळ समितीनंही लोटे एमआयडीसीत होणार्‍या प्रदुषषणाबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ काहीही कारवाई करत नसल्याचं आपल्या अहवाल म्हटलं आहे.

close