गोंधळ घालणार्‍या आमदारांचे निलंबन मागे

March 29, 2011 9:34 AM0 commentsViews: 1

29 मार्च

विरोधकांच्या बहिष्कार आंदोलनाला चार दिवसानंतर यश आलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घालणार्‍या युतीच्या 9 आमदारांचेनिलंबन आज मागे घेण्यात आलं आहे. विधानसभेत निलंबन मागे घेत असल्याचा ठराव संमत करण्यात आला. हर्षवर्धन पाटील यांनी सभागृहात यासंदर्भातला प्रस्ताव मांडला आणि विधानसभेनं त्याला सहमती दिली. राज्याचं अर्थसंकल्प मांडताना गोंधळ घातल्यामुळे युतीच्या नऊ आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. या 9 आमदारात 5 शिवसेनेचे तर 4 भाजपचे सदस्य होते. यावेळी निलंबित सदस्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त केली. पुन्हा असं होणार नाही अशी हमी या सदस्यांनी दिली. अध्यक्षांच्या दालनात ही हमी या सदस्यांनी दिली.दरम्यान, त्याआधीच विरोधकांनी विधिमंडळाच्या कामकाजावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला होता.

close