मुंबईच्या थिअटर्समध्ये मॅच दाखवणार नाही ; पोलिसांची महाग सुरक्षा

March 29, 2011 10:28 AM0 commentsViews: 2

29 मार्च

क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल आणि सेमी फायनल मॅच मुंबईतील थिअटर्समध्ये दाखवले जाणार नाहीत. सुरक्षेवर होणारा खर्च आणि मॅच दरम्यान अनेक वेळा फॅन्स तोडफोड करतात. त्यामुळे थिअटर्स मालकांनी हा निर्णय घेतला आहे. मंुबई पोलिसांनी थिअटर्स आणि हॉटेल मालकांना योग्य सुरक्षा ठेवण्याची नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांची सुरक्षा ठेवावी असंही सांगण्यात आलं आहे. सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे सुरक्षा रेट कार्ड आहे.

एक हवालदार किंवा कॉन्सटेबलसाठी दोन हजार रुपये आणि एका वरिष्ठ अधिकारी 5 हजार रुपये मोजावे लागतात. सामन्याच्या दिवशी किमान एक वरिष्ठ अधिकारी आणि चार ते पाच हवालदार किंवा कॉन्स्टेबल ठेवावे लागणार आहे. म्हणजे एका सामन्याचा सुरक्षेचा खर्च झाला 15 ते 20 हजार रुपये. त्याचबरोबर प्राव्हेट सिक्युरिटीचा खर्च तो वेगळाच. यामुळे मुंबईतील थिअटर्स आणि हॉटेल मालकानी क्रिकेटचे सेमी फायनल आणि फायनल सामने न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.