काळा पैसा प्रकरणी कोर्टाने केंद्र सरकारला पुन्हा एकदा फटकारले

March 29, 2011 9:42 AM0 commentsViews: 4

29 मार्च

सुप्रीम कोर्टाने काळ्या पैश्याच्या प्रकरणी केंद्र सरकारला पुन्हा एकदा फटकारलंय. सुप्रीम कोर्टाने निलंबित पोलीस अधिकारी अशोक देशभ्रतार यांनी तयार केलेल्या सीडी बद्दल विचारणा केली आहे. देशभ्रतार यांनी हसन अलीच्या चौकशीची सीडी तयार केली होती. सुप्रीम कोर्टाने आज मंगळवारी काळ्या पैशा संदर्भात तपासावर नापसंती व्यक्त केलीय. काळा पैशाचा स्त्रोत शोधण्याबाबतीत केंद्र सरकारने काहीच प्रगती केली नाही अशे ताशेरे कोर्टान ओढले. या प्रकरणी सर्व चौकशी आणि साक्षी यांचा व्हिडिओ आणि ऑडियोे चित्रण करावे असे ही निर्देश सुप्रीम कोर्टाने ईडीला दिले आहे.

close