डाऊ हटवा, आंदोलन मागे घेऊ – बंडातात्या कराडकर

November 8, 2008 11:03 AM0 commentsViews: 61

8 नोव्हेंबरउपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात येऊन डाऊ प्रकल्प हटवण्याचं आश्वासन द्यावं, तर आंदोलन मागे घेतलं जाईल अशी अट बंडातात्या कराडकर यांनी घातली आहे. तरच त्यांना पंढरपूरात येऊ दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.' पूजा रद्द व्हावी अशी आमची कधीच इच्छा नव्हती. पूजा करताना वारकर्‍यांचं हीतंही जपलं जावं, एवढीच आमची मागणी आहे. या पूजेत कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, अशी वारकर्‍यांच्या एका गटाची मागणी आहे. त्यांचा मान ठेऊन पूजेत गोंधळ होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ ' अशी प्रतिक्रिया बंडातात्या कराडकर यांनी दिली.

close