मोहालीत बॉलिवूड स्टारचा माहोल

March 29, 2011 10:51 AM0 commentsViews: 5

29 मार्च

भारत-पाकिस्तान सेमिफायनलचा फिव्हर तर वाढतोच आहे. आणि त्यातून फिल्म स्टार्सही सुटलेले नाहीत. बुधवारची ब्लॉकबस्टर मॅच चांगलीच ग्लॅमरस होणार आहे. 50 टक्के पेक्षा जास्त बॉलिवूड आपली शूटिंग्ज रद्द करून मॅच पाहायला जाणार आहे. आमिर खानने रीमा कागतीच्या सिनेमाचं शूटिंग रद्द केलं आहे. आणि मोहालीला तो आपल्या क्रिकेटर्सना चिअर अप करायला जातोय. अक्षय कुमारला तर पंजाबच्या उपमुख्यमंत्र्याचे आमंत्रण आहे. अभिषेक बच्चनचाही मोहालीला जायचा प्लॅन आहेच. याशिवाय सिद्धार्थ मल्ल्यासोबत दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, अरबाज खान, सोहेल खान, सुनील शेट्टी असणार आहे. आणि धर्मेंद्रचे पूर्ण कुटुंबही मॅच पाहायला येणार आहे. एकूणच मोहालीला आता वेगळाच माहोल तयार झाला आहे.

close