महाविद्यालयाना दिलासा ; प्राचार्यांच्या नियुक्तीचा निर्णय रद्दबातल

March 29, 2011 9:52 AM0 commentsViews: 2

29 मार्च

प्राचार्यांची नियुक्ती न करणार्‍या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यातील 300 महाविद्यालयाना दिलासा मिळाला आहे. यासोबतच या संस्थांशी निगडीत असलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्यही सुरक्षित झाल्याचे स्पष्ट झालं आहे.

ज्या शिक्षणसंस्था महाविद्यालयाच्या प्राचार्यांची पदे भरणार नाही त्यांची मान्यता रद्द करा आणि महाविद्यालये बंद करा असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने 30 डिसेंबर 2008 ला दिला होता. नागपूर खंडपीठाच्या या निर्णयाला खाजगी संस्थांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. कॉलेजची मान्यता रद्द करण्याचे काम कोर्टाचे नाही तर संबधित विद्यापीठ आणि राज्य सरकारचे आहे अस सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

close