26/11 हल्ल्याच्या तपास पाकमध्ये करण्यास परवानगी

March 29, 2011 11:12 AM0 commentsViews: 4

29 मार्चमोहालीत उद्या होणार्‍या भारत-पाक सेमीफायनल मॅचचा उत्साह शिगेला पोहचला. तर दुसरीकडे क्रिकेटच्या निमित्ताने सुरू असलेल्या दोन्ही देशांच्या राजकीय डिप्लोमसीचे सकारात्मक परिणाम दिसुन येत आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेली भारत-पाकिस्तानच्या गृहसचिवांमधील चर्चा आज संपली. या बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यात मुंबई हल्ल्याचा तपास पाकिस्तानमध्ये जाऊन करायला भारतीय तपास पथकाला पाकिस्तानने तत्वतः मान्यता दिली आहे.

दहशतवादासंबंधी माहितीच्या देवाणघेवाणीसाठी हॉटलाईन सुरू करण्यावर दोन्ही देशांच्या गृहसचिवांमध्ये एकमत झाले आहे. गृहसचिवांच्या बैठकी दरम्यान वर्षभरात दोनवेळा बैठक घेण्यावरही एकमत झालं आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निमंत्रणाची परतफेड करण्याची पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांची इच्छा असल्याचं समजतंय. त्यासाठी गिलानी मनमोहन सिंग यांना त्यांच्या पाकिस्तानातील मूळ गावी भेटीचं निमंत्रण देण्याची शक्यता आहे.

close