पुण्यात भारत -पाक मॅचसाठी स्क्रिन लावण्यास बंदी

March 29, 2011 12:27 PM0 commentsViews: 3

29 मार्च

वर्ल्ड कप फिव्हर आता शिगेला पोहोचला आहे. कारण अर्थातच भारत आणि पाकिस्तान मध्ये होणारी सेमीफायनल मॅच. ही मॅच एकत्र येऊन पाहण्याचा आनंद तर काही औरच. त्यामुळेच मॅच पाहण्यासाठी स्क्रिन लावायला परवानगी मागणारे अनेक मंडळांचे अर्ज पुणे पोलिसांकडे आले होते. पण रस्त्यांवर आणि चौकांमध्ये स्क्रिन लावुन मॅच पाहायला बंदी घालण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.

वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आणि मॅच नंतर येऊ शकणारी प्रतिक्रिया लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. या बंदी नंतरही जे स्क्रिन लावतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. अर्थात मल्टिपेल्क्स मल्टिपेक्समध्ये, हॉटेल्स,बार आणि मोकळ्या मैदानांमध्येे मॅचचं प्रक्षेपण करायला पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे.

close