कुविख्यात गुन्हेगार छोटुसिंग पोलिसांच्या जाळ्यात

March 29, 2011 2:53 PM0 commentsViews: 2

29 मार्च

झारखंडच्या रांची पोलिसांना हवा असलेला नक्षलवादी छोटुसिंग मुंडा आणि त्याच्या एका साथीदाराला शहाद्यात अटक केली आहे. छोटुसिंग अपहरण, स्फोट, खून अशा अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता. छोटुसिंग हा लोकल गोरीला स्कॉडचा कमांडर असून तो आणि त्याचा साथीदार एका सूतगिरणीत नाव बदलून काम करत होते.

रांचीचे डीवायएसपी अपूर्व आणि शहाद्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र रायसिंग यांनी सापळा रचून त्यांना अटक केली. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील सूतगिरणीतही त्यांनी काही दिवस काम केलं होतं. छोटूसिंगवर रांचीच्या डीवायएसपीची हत्या, भूसुरूंग स्फोट, अपहरण असे 14 गुन्हे दाखल आहेत. या दोघांना सात दिवसांचा ट्रान्झीट रिमान्ड देण्यात आला आहे.

close