गोंदियात 13 वर्षाच्या गतीमंद मुलीवर बलात्कार

March 29, 2011 3:09 PM0 commentsViews: 8

29 मार्च

गोंदियातील गिवारी गावात एका 13 वर्षाच्या गतीमंद मुलीवर 21 वर्षाच्या मुलाने बलात्कार केला आहे. मोनू ओमकार गौतम असं या बलात्कार करणार्‍या मुलाचे नाव आहे. या मुलीच्या घरात घुसून त्याने बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीच्या बहिणीने हा प्रकार घडताना पाहिलं आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न करायला गेली असता तिलाही धमकावलं. हा प्रकार दडपण्याचा प्रकार होत असताना माध्यमाचे प्रतिनिधी तिथे पोहोचल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी रावणवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

close