मॅचसाठी बच्चेमंडळींची शाळेला बुट्टी

March 29, 2011 3:21 PM0 commentsViews: 4

29 मार्च

नाशिकचं कान्हेरे मैदान सध्या वर्ल्डकपमय झालंय. येथील छोट्या खेळाडूंनी टीम इंडियाला चीअर करण्यासाठी खास तयारी केली आहे. कुणी चेहरा रंगवून घेतलाय तर कुणी केस रंगवले आहेत. उद्याही या खेळाडूंनी मॅच बघण्यासाठी खास नियोजन केलं आहे. ही सगळी बच्चेमंडळी उद्या शाळेला बुट्टी मारणार आहेत. या बच्चे कंपनीच्या मनात एकएक हिरो आहे. कुणाला सचिन, कुणाला युवराज तर कुणाला सेहवाग आपला वाटतो. मॅच सुरु व्हायला काही तास बाकी आहेत. मात्र ही मुलं मात्र आत्ताच मनानी मोहालीत दाखल झाली आहे.

close