भारत जिंकल्यास टांग्याने फुकट प्रवास !

March 29, 2011 3:31 PM0 commentsViews: 1

29 मार्च

वर्ल्ड कप स्पर्धेच्या भारत पाकिस्तान सेमीफायनल मॅचची उत्सुक्ता शिगेला पोहचली आहे. एकेकाळी व्यापाराचे बंदर असणार्‍या कल्याणमध्ये टांगेवाल्यानी मॅचसाठी नवी शक्कल लढवली आहे. 30 मार्चला जर भारताने मॅच जिंकली तर दुसर्‍या दिवशी टांग्याने फुकट प्रवास करा अशी योजना कल्याणच्या टांगा युनियनने सुरू केली आहे. अश्या या आगळ्यावेगळ्या योजनेची तिकीट आज टांगेवाल्यानी प्रवाश्याना वाटाली.

close