पाईपलाईनमध्ये बिबट्याचा घरोबा..

March 29, 2011 6:22 PM0 commentsViews: 4

29 मार्च

मुंबईत गोरेगाव येथे आरे कॉलनीत गेल्या आठ तासांपासून एका बिबट्या पावसाळी पाईपलाईनमध्ये आराम करतोय. रस्ता चुकल्याने हा बिबट्या चक्क पाईपलाइनमध्येच जाऊन बसला आहे. आता या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी चक्क मुंबई पोलीस, फायर ब्रिगेड आणि वनअधिकार्‍यांनी प्रयत्न केले. पण हे महाशय पाईपलाइनमध्ये आरामात पहुडले आहेत.

सध्या तरी यातून बाहेर येण्याचा त्यांचा विचार दिसत नाही. पण खबरदारीचा उपाय म्हणून वनाधिकार्‍यांनी पाईपलाइनच्या एका तोंडाला पिंजरा लावला आहे. तर दुसर्‍या बाजूचं तोंड बंद करण्यात आलंय. तसेच या महाशयांची उपासमोर होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी खास कोंबडीचा बेतही वनाधिकार्‍यांनी ठेवला आहे.

close