चांद्रयान 1 पोहचलं चंद्राच्या कक्षेत

November 8, 2008 11:44 AM0 commentsViews: 66

08 नोव्हेंबर , भारताचं चांद्रयान 1 हे यान आता चंद्राच्या कक्षेत पोहचलंय. सध्या ते चंद्राच्या कक्षेपासून 504 किलोमीटर अंतरावर फिरत आहे. चंद्राच्या शंभर किलोमीटरच्या कक्षेत गेल्यावर त्याच्याकडे असलेले इंम्पॅक्टर प्रोब चंद्रावर सोडेल. काही वेळात इंम्पक्टॅर प्रोब चंद्रावर आदळेल. त्यानंतर भारताच्या चांद्रस्वारीवर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. याक्षणाची इस्त्रोचे सर्व शास्त्रज्ञही आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी या यशाबद्दल इस्त्रोच्या शास्त्रज्ञाचं अभिनंदन केलं आहे.

close