हसन अलीची कारगृहाबाहेर चौकशीची ई डीला परवानगी

March 30, 2011 2:22 PM0 commentsViews:

30 मार्च

हसन अलीची कारगृहाबाहेर चौकशी करण्याची परवानगी ई डीला मिळाली आहे. मुंबई स्पेशल सेशन्स कोर्टाने ही परवानगी दिली आहे. 1 एप्रिल पर्यंत ईडी आपल्या ऑफिसमध्ये हसन अलीला चौकशीसाठी घेऊन जाऊ शकते. मात्र दर दिवशी संध्याकाळी हसन अलीला पुन्हा तुरूगात सोडावे लागणार आहे.

सेशन्स कोर्टाने दिलेल्या या परवानगीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे हसन अलीच्या वकिलांनी सांगितले आहे. हसन अलीचे वकील उद्या गुरूवारी सुप्रीम कोर्टात दावा दाखल करणार आहेत. हसन अलीची केस ज्या बेंचकडे आहे त्यांच्याकडेच दावा दाखल करणार असल्याचे हसन अलीच्या वकिलांनी सांगितले आहे.

close