सचिनचं शतक हुकलं

March 30, 2011 11:15 AM0 commentsViews: 5

30 मार्च

सचिननं 85 रन्सची झुंजार खेळी केली पण तो आज भलताच नशिबवान ठरून ही सेंचुरी मात्र पूर्ण करू शकला नाही. त्याला आजच्या मॅचमध्ये तब्बल 6 वेळा जीवदान मिळाले. पहिली दोन जीवदानं रेफरल सिस्टीममुळे मिळाली. सचिनविरुध्दचं एलबीडब्ल्यु आणि स्टम्पिंगचं अपिल रेफरल फेटाळलं गेलं. त्यानंतर सचिन 27 रन्सवर असताना मिसबाह उल हक तर 45 रन्सवर असताना युनीस खाननं त्याला सोपं जीवदान दिलं. दोन्हीवेळेला दुदैर्वी बॉलर होता शाहिद आफ्रिदी. त्यानंतर विकेटकिपर अकमलने स्टम्पमागे दोनदा सचिनला जीवदान दिलं. अखेर सईद अजमलने त्याची विकेट काढली. शाहिद आफ्रिदीनंच त्याचा अजमलच्या बॉलिंगवर कॅच पकडला. सचिनने वन-डे मधील आपली 95 वी हाफ सेंच्युरी पूर्ण केली.

सचिनच्या शानदार हाफ सेंच्युरीमुळे भारताने सहाच्या ऍव्हरेजने दोनशेरन्सचा टप्पा पार केला. सचिन आणि सेहवागनं भारताला आक्रमक सुरूवात करून दिली. पण भारताची मधली फळी मात्र कोसळली. बहाब रियाझने लागोपाठच्या दोन बॉल्समध्ये विराट कोहली आणि त्यानंतर युवराज सिंगला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मॅचचा सुरूवातीला पहिली बॅटिंग करणार्‍या भारतानं आक्रमक सुरुवात केली. ओपनिंगला आलेल्या वीरेंद्र सेहवागने अवघ्या 25 बॉलमध्ये 9 फोर मारत 38 रन्स केले. पण फटकेबाजीच्या नादात तो आऊट झाला. वहाब रियाझनं त्याची विकेट घेतली. पण यानंतर सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीरनं भारताची इनिंग सावरली. पण गंभीर 27 रन्सवर आऊट झाला.

close