परवानगी घेतली नाही चूक झाली – ‘लवासा’

March 30, 2011 2:35 PM0 commentsViews: 1

30 मार्च

लवासा प्रकरणी आज बुधवारी हायकोर्टात सुनावणी झाली. या प्रकल्पासाठी पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेतली नाही ही चूक झाली असं लवासाने मान्य केले आहे. त्याचबरोबर बांधकामाला दिलेले स्थगितीचे आदेशही कायम राहणार आहेत. लवासाने पर्यावरण मंत्रालयाच्या विरोधातील याचिका मागे घेण्याचा प्रस्ताव कोर्टात ठेवला. मात्र याचिका मागे घेतली तरी पर्यावरण मंत्रालयाने काम जैसे थे ठेवण्याची नोटीस लवासाला पाळावी लागेल असं हायकोर्टाने सांगितले आहे.

close