पाकची दमछाक 6 गडी माघारी

March 30, 2011 4:02 PM0 commentsViews: 4

30 मार्च

मोहालीत भारत आणि पाकिस्तान सेमी फायनल चांगलीच रंगात आली आहे. भारताने ठेवलेल्या 261 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना पाकिस्तानची चांगलीच दमछाक झाली आहे. पाकिस्तानचे सहा बॅटसमन 150 रन्सवरचं आऊट झाले आहेत. आणि विशेष म्हणजे युवराजने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बॅटिंगला खिंडारपाडलं आहे. युवराजने असद शफिक आणि युनीस खानची विकेट काढली आहे. तर झहिर खानने कामरान अकमलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मोहम्मद हाफिझचा अडथळा मुनाफ पटेलनं दुर केला. याआधी भारताने टॉस जिंकत पहिली बॅटिंग केली होती. सचिनने केलेल्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर भारताने पाकसमोर 261 रन्सचे आव्हान ठेवले आहे.

close