फायनल मॅचसाठी मुंबईकरांना सुट्टी जाहीर

March 31, 2011 10:41 AM0 commentsViews: 1

31 मार्च

वर्ल्ड कप स्पर्धेची 2 एप्रिलला होणार्‍या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. या वर्ल्ड कप फायनलसाठी मुंबई आणि उपनगरांमध्ये शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजितपणेच होतील असंही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान या मॅचवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्यानं कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्यातच आता वानखेडे परिसरात नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे. केंद्राच्या परवानगीनंतर मुंबई पोलिसांचा हा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी ही घोषणा केली आहेत. आज गुरूवारपासून दोन एप्रिलपर्यंत हा नो फ्लाईंग झोन असेल.

close