ओव्हर ड्राफ्ट काढलेला नाही – अजित पवार

March 31, 2011 11:04 AM0 commentsViews: 3

31 मार्च

विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. राज्य सरकारने एका रुपयाचाही ओव्हर ड्राफ्ट काढला नसल्याचं प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे. आघाडी सरकारने राज्य दिवाळखोरीत नेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला होता.बजेटवरील चर्चेच्यावेळी खडसेंनी हा आरोप केला होता. मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या चर्चेला उत्तर देताना हा दावा केला आहे. राज्य सरकारने एकदाही ओव्हर ड्राफ्ट काढलेला नाही असं सांगत त्यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा आरोप खोडून काढला.

राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. खडसे यांनी कुठल्या रिपोर्टच्या आधारे आरोप केले ते आपल्याला माहिती नाही असंही ते म्हणाले. तर सरकारने ओव्हर ड्राफ्ट काढला असल्याचा पुनरुच्चार एकनाथ खडसे यांनी केला आहे. हा दावा सरकारी प्रकाशनाच्या माहितीवरूनच केला असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच यासंदर्भात अजित पवार यांनी माफी मागावी अन्यथा हक्कभंग आणण्याचा इशारा एकनाथ खडसेंनी दिला.

close